Thursday, October 30, 2014

most important for upsc

यू पीएससीच्या चौथ्या पेपरचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे सामाजिक मानसशास्त्र (social psychology) होय. या घटकामध्ये खालील विषयांचा समावेश होतो.

वृत्ती अथवा दृष्टिकोन (Attitude) (घटक, रचना व कार्ये)
दृष्टिकोनाचा विचार आणि वर्तनाशी असलेला संबंध
दृष्टिकोन-सामाजिक प्रभावाचे आणि मतपरिवर्तनाचे साधन

नैतिक आणि राजकीय दृष्टिकोन
भावनिक बुद्धिमत्ता (संकल्पना, उपयुक्तता आणि उपयोजन)
या विषयांची तयारी करण्यासाठी उमेदवारांनी योग्य अभ्यास साहित्याचा वापर करणे आवश्यक आहे. एकंदरीतच वरील विषय हे नेमके व गुंतागुंतीचे असे आहेत. जेव्हा वृत्तींचा किंवा दृष्टिकोनांचा (Attitude) सामाजिक मानसशास्त्रात विचार केला जातो तेव्हा या शब्दाच्या सर्वसाधारण अर्थापेक्षा वेगळा असा अर्थ त्यामध्ये अभिप्रेत आहे. रोजच्या वापरामध्ये जेव्हा आपण या शब्दाचा वापर करतो तेव्हा एखाद्याची वृत्ती 'बेदरकार', 'धाडसी', 'खुनशी' असते, अशा प्रकारे केला जातो. एखाद्या गोष्टीविषयी असलेल्या दृष्टिकोनांमधून त्याबद्दलच्या वृत्ती तयार होत असतात.
वृत्ती म्हणजे काय याच्या विविध व्याख्या आजपर्यंत करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारणत: वृत्ती म्हणजे एक मानसशास्त्रीय स्पष्टीकरण असणारा असा विशिष्ट कल आहे. ज्यामधून व्यक्ती सभोवतालच्या व्यक्तींचे परिस्थितीचे विश्लेषण करीत असते व त्याआधारे त्या व्यक्तीबद्दल अथवा परिस्थितीबद्दल चांगले किंवा वाईट ग्रह बनत असतात व त्यावर आधारित निर्णय आपण घेत असतो. एखाद्या व्यक्तीबद्दलची अथवा परिस्थितीबद्दलची आपल्या स्मृतीतील सारांश व त्याबद्दलचे आपण करत असलेले ग्रह यांच्यातील दुवा म्हणजे देखील वृत्ती होय. सोप्या भाषेत सांगायचे तर सकारात्मक अथवा नकारात्मक भावना निर्माण करण्याची प्रक्रिया ही या व्यक्तीच्या वृत्तीवर अवलंबून असते. या सर्व व्याख्यांमधील सूक्ष्म फरक बाजूला ठेवल्यास एक गोष्ट आपल्या लगेच लक्षात येते ती म्हणजे वृत्ती व त्यावर आधारित निर्णय घेणे अथवा कौल ठरविणे यात जोडलेला मूलभूत संबंध म्हणूनच वृत्ती आपल्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर प्रत्यक्ष परिणाम करत असते. एखादा सामाजिक-सांस्कृतिक मुद्दा, वस्तू अथवा व्यक्ती हे आवडणे अथवा न आवडणे हे काही अंशी व्यक्तीच्या वृत्तीवर अवलंबून असते. यावरून वृत्ती (Attitude)म्हणजे एक प्रकारे विविध गोष्टींचे/ व्यक्तींचे केलेले मूल्यमापन असते, असे आपण म्हणू शकतो. पण मग असा प्रश्न उपस्थित होतो की, हे मूल्यमापन कोणत्या निकषांवर आधारित असते? हे समजून घेण्यासाठी, असे मूल्यमापन कोणत्या घटकांवर अवलंबून असते हे पाहणे गरजेचे आहे. वृत्ती तीन वेगवेगळ्या घटकांनी बनलेल्या असतात. हे तीन घटक पुढीलप्रमाणे आहेत- आकलनात्मक अथवा ज्ञानात्मक घटक (Cognitive)वर्तनात्मक घटक (Behavioural), भावनात्मक घटक (Affective).
वरील सर्व घटक पाहता, ते खूप क्लिष्ट आहेत असे वाटत असले तरी, बारकाईने विचार केल्यास आपल्या आजूबाजूला ते कायम दिसत असतात, हे आपल्या लगेच लक्षात येईल. अनेक वेळा एखादे मत ठरवत असताना आपण फायद्या-तोटय़ांचा सखोल विचार करून ते ठरवत असतो. उदा. लॅपटॉप खरेदी करण्याआधी आपण अतिशय खोलात जाऊन, विविध कंपन्या, त्यांची विविध लॅपटॉप मॉडेल यांचा विचार करून कोणता ब्रँड आपल्याला पसंत आहे हे ठरवतो. तसेच काही वेळा आपण भावनांच्या प्रतिसादावरून दृष्टिकोन ठरवतो. जसे की, 'मला या कापडाचा स्पर्श खूप आवडला' किंवा 'यावरील कलाकुसर मला खूप भावली'. या सर्वाचा भावनात्मक घटकांत समावेश होतो. वर्तनात्मक घटक हे त्या विषयावरील तुमच्या पूर्वानुभवातून बनतात. एखाद्या उपाहारगृहात जेव्हा तुम्ही आधी गेला होतात तेव्हा तुम्हाला उत्तम सेवा मिळाली, म्हणून तुम्ही पुन:पुन्हा तेथे जाता आणि या प्रक्रियेमधून त्या उपाहारगृहाविषयी तुमचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. अनेक वेळा एखाद्या गोष्टीविषयीच्या वृत्ती एकापेक्षा जास्त घटकांवरसुद्धा अवलंबून असू शकतात. वृत्तीच्या रचनेकडे पाहिल्यास आपल्या असे लक्षात येते की, दृष्टिकोन बनवत असताना व्यक्ती त्या गोष्टीकडे समतोल अंगाने पाहते का याचा विचार केला जातो.
वृत्ती मानवी आयुष्यात प्रामुख्याने काय भूमिका बजावतात यावर डॅनिअल कॅट्झ या मानसशास्त्रज्ञाने काम केले आहे. वृत्तींचे कार्य पुढीलप्रमाणे आहे - ज्ञानाचे नियोजन, उपयुक्तता, 'स्व'चे संरक्षण, तत्त्वांचा स्वीकार.
एकंदरीतच वृत्ती अथवा दृष्टिकोनाचे कार्य आपल्या सहज लक्षात येत नसले तरी मानवी आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग व्यापणारे आहे. वरती दिलेल्या चार मुद्दय़ांविषयी अधिक सखोल चर्चा करणे शक्य आहे. मात्र त्या आधी नागरी सेवेत वृत्तीचे व त्याच्या आकलनाचे काय महत्त्व असते हे समजून घेणे आवश्यक आहे. वृत्ती आणि वर्तन यामध्ये अतिशय जवळचा परस्पर संबंध आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांवर प्रभाव पाडू शकतात. एखाद्या गोष्टीबद्दलचा दृष्टिकोन बदलला की वर्तन बदलते ही बाब लक्षात घेतल्यास अनेक ठिकाणी प्रशासनात व कामकाजामध्ये बदल घडवून आणणे शक्य होते. उदा. एका प्रशासकीय अधिकाऱ्याला आपल्या सहकाऱ्यांनी मानवी हक्कांबद्दल अधिक जागरूक व संवेदनशील असावे असे वाटत असेल तर वृत्ती किंवा दृष्टिकोन कसे बनतात व कसे बदलले जाऊ शकतात याच्या ज्ञानाचा
फायदा होऊ शकतो. अधिकाऱ्यास अपेक्षित असलेल्या वर्तनात बदल केवळ नियम बदलून घडवून आणला जाऊ शकत नाही. या व अशा अनेक परिस्थितींमध्ये वृत्ती किंवा दृष्टिकोनाचे घटक, रचना व कार्य याची जाण असणे अधिक अर्थपूर्ण निर्णय घेण्यास मदत
करू शकते.

डेंगीचा विषाणू


 डेंगीचा विषाणू डास चावण्याने माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. शरीरात गेल्यापासून तीन ते दहा दिवसांनी (बहुतेक वेळा पाच-सहा दिवसांनी) एकाएकी खूप थंडी वाजून बराच ताप अंगात येतो. सामान्यपणे डेंगीचा ताप पाच ते सात दिवसांत उपचार न करताच उतरतो. मात्र काही जणांत खूप गंभीर परिस्थिती उद्‌भवू शकते. डेंगीच्या तापाचे सर्वांत महत्त्वाचे आणि अतिशय त्रासदायक लक्षण म्हणजे प्रचंड प्रमाणात होणारी डोकेदुखी, स्नायूंची व सांध्यांची वेदना हे होय.
डॉ. ह. वि. सरदेसाई

डेंगी विषाणूंमुळे माणसात आजार होतात. अनेकदा शरीरात विषाणू प्रवेश करतात, परंतु माणसाला कोणताच त्रास होत नाही. काहींना डेंगीचा ताप येतो, तर काहींना डेंगीच्या तापात रक्तस्त्राव होतो. या रक्तस्राव होणाऱ्या रुग्णांपैकी काहीकाहींना तापाबरोबर रक्तदाब खूप कमी होतो व रुग्णाची परिस्थिती खूप गंभीर होऊ शकते. सामान्यपणे डेंगीचा ताप पाच ते सात दिवसांत उपचार न करताच उतरतो. डेंगीच्या तापाचे सर्वांत महत्त्वाचे आणि अतिशय त्रासदायक लक्षण म्हणजे प्रचंड प्रमाणात होणारी डोकेदुखी, स्नायूंची व सांध्यांची वेदना हे होय. डेंगीचा विषाणू डास चावण्याने माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. शरीरात गेल्यापासून तीन ते दहा दिवसांनी (बहुतेक वेळा पाच-सहा दिवसांनी) एकाएकी खूप थंडी वाजून बराच ताप अंगात येतो. अंग एवढे दुखते, की कोणतीही हालचाल करणे महाकष्टाचे होते. २४ तास डोळ्यांच्या मागची बाजू दुखू लागते. उजेड सहन होत नाही. एका बाजूने दुसरीकडे डोळे फिरवताना आणि डोळ्यांवर हलकासा दाब दिल्यास दखलपात्र वेदना होतात. प्रचंड थकवा जाणवतो. भूक अजिबात लागेनाशी होते. शौचाला होत नाही (मलावरोध होतो). अन्नाची चव जाते, पोटात कळा येतात. पोटावर हलकासा दाब दिला तरी पोटात वेदना जाणवतात (पोट दुखरे होते), जांघांच्या भागात ‘ओढल्याप्रमाणे’ भावना येऊ लागतात, घसा दुखतो आणि एकंदरीत मरगळ येते. सर्वसाधारणपणे ३९ ते ४० डिग्रीज सेंटिग्रेड (१०२ ते १०४ फॅरेनहीट) एवढा ताप सुरू झाल्यावर अनेक रुग्णांत काही तास ते दोन दिवसांत आपोआप उतरतो. ८० टक्के रुग्णांच्या अंगावर पुरळ (रॅश) उठते. हे पुरळ मध्यंतरी ताप उतरतो त्या काळात किंवा पुन्हा ताप चढतो तेव्हा उठते. हे पुरळ एक-दोन दिवस टिकते. पुरळ उठताना पहिल्यासारखे अंगदुखीचे त्रास होतात. पण या खेपेस ते सौम्य असतात. सुरवातीला हे पुरळ चेहरा, मान व छातीवर दिसते. तिसऱ्या- चौथ्या दिवशी हे पुरळ छातीवरून अंगावर आणि हातापायांवर पसरते. पुरळ उठते तेथे कंड सुटते आणि तेथील त्वचा संवेदनाक्षम बनते. हे पुरळ दोन तासांपासून काही दिवसांपर्यंत त्वचेवर टिकून राहते. सात-एक दिवसांत ताप उतरला तरी पूर्ण बरे व्हावयाला बराच काळ लागतो. अशा प्रकारच्या डेंगीच्या तापामध्ये जिवाला धोका नगण्य असतो. डेंगीला जबाबदार असणाऱ्या विषाणूंमध्ये चार प्रकारचे विषाणू असतात. ज्या प्रकारच्या विषाणूमुळे आजार होतो, त्या प्रकारच्या विषाणूंमुळे पुन्हा आजार होत नाही, परंतु इतर प्रकारच्या विषाणूंपासून आजार होऊ शकतो.

डेंगीमुळे हा प्रकार गंभीर आजाराला जबाबदार असतो. या वेळी एकापेक्षा अधिक प्रकारचे डेंगीचे विषाणू शरीरात प्रवेश करतात, ज्या विषाणूंमुळे शरीरात डेंगीच्या विषाणूंविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होऊ लागते. आता दुसऱ्या प्रकारचे विषाणू शरीरात आला की प्रतिकारशक्तीमध्ये प्रचंड उलाढाल होते. डेंगीचा विषाणू एडिस इजिप्टी प्रकारचे डास चावण्याने माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. या तापाची सुरवात डास चावल्यानंतर चार ते सहा दिवसांनी होते. सुरवातीलाच अंगात जोराचा ताप भरतो. डोके प्रचंड दुखू लागते. चेहरा गुलाबी रंगाने फुलतो. भूक जाते, उलट्या होतात. वरच्या पोटात अस्वास्थ्य जाणवते. वरच्या पोटात उजव्या बाजूला फासळ्यांची कड दुखरी होते. पोटात सगळीकडे दुखू लागते. ताप वाढतो. १०४ ते १०५ अंश फॅरेनहीटपर्यंत ताप जातो. लहान मुलांना या वाढलेल्या तापामुळे फीट येणे संभवते. आता रक्तातील प्लेटलेट पेशींचे प्रमाण कमी होऊ लागते आणि रक्तवाढ होऊ लागल्यामुळे हीमॅटोक्रिट व्हॅल्यू वाढते. हे दोन बदल हमखास होतात. त्वचेवर केशवाहिन्यांतून रक्तस्राव झाल्यामुळे डाग पडतात. उलटीतून रक्त बाहेर पडते किंवा शौचाला डांबरासारख्या काळ्या रंगाचा मळ बाहेर पडू लागतो. रुग्णाला तपासताना पोटात उजव्या बरगड्यांच्या खाली यकृताचा आकार वाढल्याने कळते.
अशा रक्तस्राव होणाऱ्या डेंगी तापामध्ये काही रुग्ण कमालीचे गंभीर असू शकतात. त्यांच्या नाडीची गती जलद होते, हात गार पडू लागतात. रक्तदाब कमी होऊ लागतो. रुग्ण अस्वस्थ होतो. या स्थितीतून रुग्णाची स्थिती आणखी गंभीर होऊ शकते व जिवाला धोका निर्माण होतो.

डेंगी तापावर आजार बरा करता येईल असे औषध सापडलेले नाही, संपूर्ण विश्रांती इष्ट आहे. ॲस्पिरीन या औषधाचा वापर टाळावा. कारण ॲस्पिरीनमुळे जठराच्या अस्तराचा दाह होऊन रक्तस्राव अधिकच होण्याचा धोका मोठा असतो. ज्या रुग्णांना खूप घाम सुटत असतो, उलट्या होतात किंवा जुलाब होतात त्यांना तोंडाने प्रवाही पदार्थ आणि क्षार असणारे पाणी देत राहावे. झपाट्याने शिरेत सलाईन देण्याचे फुफ्फुसात पाणी भरले जाण्याचा धोका असतो, याकडे लक्ष ठेवावे. डेंगीच्या तापाचा प्रतिबंध म्हणजे डासांची पैदास रोखणे होय. डेंगीच्या ताप येऊ नये याकरता कोणतीही लस उपलब्ध नाही. विषाणूंविरुद्ध उपयोगी पडेल असे प्रतिजैविक (अँटिबायोटिक) देखील नाही. भारतात सर्वत्र डेंगीचा ताप होताना आढळतो.




नाकातून उपचार करणे
नाक शरीराचे मुख्य द्वार आहे. नाक वरच्या बाजूने मेंदूशी जोडलेले असते. म्हणून मानेपासून वरच्या रोगांवर इलाज करत असताना, त्यातल्या त्यात मेंदूच्या, डोळ्यांच्या विकारांवर इलाज करत असताना, नस्य (नाकातून उपचार करणे) महत्त्वाचे ठरते. यासाठी वनस्पतींची सूक्ष्म चूर्णे, संस्कारित दूध, तूप वा तेल वगैरे द्रव्ये वापरली जातात.

मनुष्य पृथ्वीवर राहतो असे म्हटले आणि त्याचा पृथ्वीशी, पृथ्वीतत्त्वाशी व पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी संबंध असला तरी त्याच्या शरीरात ६७ टक्के पाणी असते. पंचीकरणामध्ये पृथ्वीतत्त्व ५० टक्के व इतर चार पंचमहाभूते प्रत्येकी १२.५ टक्के असतात. पाणी हे वाहत्या द्रव पृथ्वीचे निदर्शन करते. तेव्हा पृथ्वी व पाणी हे एकमेकाला पूरक आहेत.

पृथ्वीतत्त्वाचा गंध हा गुण, पण आपल्याला पाणी पिताना पाण्याला वाईट वास आला तर चालत नाही. सर्व सुवासांचे मनुष्याला आकर्षण वाटते आणि दुर्गंधाला मनुष्य दूरच ठेवतो. काही मंडळींना दुर्गंधामध्येच नाक खुपसायची सवय असते हे वेगळे. नाक हे इंद्रिय गंधाचा स्वीकार करते म्हणजेच नाक पृथ्वीतत्त्वाशी संबंधित असते व त्यामुळे ते महत्त्वाचे ठरते. ज्या चैतन्यतत्त्वावर जीवन चालू असते ते चैतन्य प्राणवायूवर, पर्यायाने हवेवर आरूढ झालेले असते. हे चैतन्य नाकाच्या माध्यमातून श्वासामार्फत शरीरात प्रवेश करते व त्याच्या शक्‍तीद्वारा मनुष्याच्या शरीरात रक्‍त तयार होते. आणि येथूनच सर्व जीवनव्यवहार सुरू होतो.

वातावरणाची समज, अन्न खाण्याची इच्छा, त्याच्या आवडीनिवडी आणि मनोधारणा या सर्व गंधतत्त्वावरच अवलंबून असतात. नाकाचा संबंध पृथ्वीशी, जलाशी, वायूशी असतो. शरीराची ऊब व उष्णता श्वासावरच अवलंबून असते. त्यामुळे अग्नीशी सुद्धा संबंध येतो, तसेच अगदी समजूनच घ्यायचे ठरविले तर आकाशतत्त्वाची पोकळी फुप्फुसांमध्ये नसेल तर नाकाने घेतलेला श्वास फुप्फुसांपर्यंत जाऊच शकणार नाही, पर्यायाने पुढे रक्‍त तयार होण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणून नाक व श्वसनमार्ग खूप महत्त्वाचे असतात. नाकासमोर चालणारी माणसे तशी बरी वाटतात, परंतु ती सर्जनशील असावीत, धाडशी असावीत, धडाडीची असावीत. खाली मान घालून नाकासमोर चालणाऱ्या व्यक्‍तीचे समाजात काहीच चालू शकत नाही.

असे हे महत्त्वाचे नाक शरीराचे मुख्य द्वार आहे. नाक वरच्या बाजूने मेंदूशी जोडलेले असते. म्हणून मानेपासून वरच्या रोगांवर इलाज करत असताना, त्यातल्या त्यात मेंदूच्या, डोळ्यांच्या विकारांवर इलाज करत असताना, नस्य (नाकातून उपचार करणे) महत्त्वाचे ठरते. यासाठी वनस्पतींची सूक्ष्म चूर्णे, संस्कारित दूध, तूप वा तेल वगैरे द्रव्ये वापरली जातात.

नाकावाटे आत घेतलेला धूर धूम्रपान, हाही एक उपचार आयुर्वेदात सांगितलेला आहे. धूर नाकावाटे आत घेतला तरी तो सोडताना तोंडावाटेच सोडायचा असतो, अन्यथा अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. सिगारेट, बिडी ओढणे ही व्यसने धूम्रपानात मोजली जाणार नाहीत, कारण धूम्रपानात औषधी वनस्पती वापरलेल्या असतात.

पूर्वकर्म, प्रधानकर्म, पश्‍चातकर्म या पद्धतीनेच नस्य करावे लागते. तयारी केल्याशिवाय कुठलाच उपचार करून उपयोग होत नाही. तसेच चार थेंब नाकात टाकले, लगेच मनुष्य बाहेर पडून फिरायला गेला तर नस्याचा त्रास होऊ शकतो. नस्यविधी व्यवस्थित करायचा असेल तर त्या दिवशी बाहेर पडून जोरात चालणे-पळणे, प्रवास करणे, बाहेर वाऱ्यावर जाणे वगैरे गोष्टी टाळाव्या लागतात. अशी सर्व काळजी घेऊन केलेल्या नस्याचे अनेक फायदे होऊ शकतात.
स्मृती कमी होणे, स्मृती नष्ट होणे, मेंदूचे विकार होणे असे अनेक विकार सध्या वाढलेले दिसतात. नस्याचे महत्त्व नीट समजून घेऊन त्याप्रमाणे उपचार केल्यास या विकारांमध्ये उपयोग झालेला दिसतो.

अगदी लहान मुलांना किंवा ८० वर्षांवरच्या ज्येष्ठ व्यक्‍तींना नस्य करताना खूप विचार करावा लागतो, तसेच अशा व्यक्‍तींबाबत वैद्याने निर्णय घेऊनच नस्य करावे.

नस्य कधी करावे याचा काळही ठरलेला असतो. हे सर्व व्यवस्थित पाळून केलेल्या नस्याचे अनेक फायदे मिळू शकतात.
नस्यामुळे पुढील विकारात विशेष फायदा होताना दिसतो,
- डोळ्यांचे विकार
- कानांचे रोग
- नाकाशी संबंधित रोग.
- डोक्‍याचे तसेच दाढी-मिशांचे केस अकाली पांढरे होणे
- केस गळणे, केसांची वाढ न होणे
- जुनाट सर्दी, अर्धशिशी, मान जखडणे
- सुरकुत्या, केस पांढरे होणे, केस गळणे, चेहऱ्यावर वांग येणे
- याशिवाय नस्याचे पुढील फायदे होत असतात,
- डोके, डोक्‍याची हाडे, डोक्‍याशी संबंधित स्नायू या सर्वांची ताकद वाढते.
- मुख प्रसन्न व टवटवीत राहते.
- स्वर स्थिर, स्निग्ध आणि खणखणीत तयार होतो.
- इंद्रियांची ज्ञानग्रहण करण्याची शक्‍ती वाढते.
- मान व मानेच्या वरच्या भागातील अवयवांचे आरोग्य उत्तम राहते.
- म्हातारपण उशिरा येते.
- मुख सुगंधित राहते.
- हनुवटी, दात, मेंदू, छाती, हात हे सर्व अवयव दृढ व बलवान राहतात.